हे वल्लभभाईंना तरी कसे पटेल? राज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा

0
1248

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावर गुजरात सरकार आणि केंद्र सरकारने सुमारे २, २९० कोटी रुपये खर्च केला आहे. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. स्मारकावर इतका खर्च केला जात आहे. हे वल्लभभाईंना तरी कसे पटेल?, असा सवाल राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून केला आहे. 

या व्यंगचित्रात नरेंद्र मोदी हे स्मारकाचे लोकार्पण करताना दाखवले आहे. याप्रसंगी वल्लभभाई पटेल यांच्या मनात काय भाव असतील, हे व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहेत. ‘तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी इतका अवाढव्य खर्च करुन आमचे पुतळे उभे करण्याची काय गरज आहे.

त्यापेक्षा आहेत ती जिवंत माणसं जगवा ना’ असे विचार वल्लभभाई पटेल यांच्या मनात येत असावे, असे या व्यंगचित्रात रेखाटले आहे. पुतळ्यावर २, २९० कोटी रुपये खर्च करणे हे वल्लभभाईंना तरी कसे पटेल ?, असा सवाल राज ठाकरेंनी व्यंगचित्राद्वारे केला आहे.