दुकानदार महिलेचा विनयभंग

0
173

तळेगाव दाभाडे, दि.१०(पीसीबी) – दुकानदार महिलेशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगर परिसरात सोमवारी (दि.9) दुपारी घडला.

पोलिसांनी याप्रकरणी मोहन गंगाधर साळवे (वय 24 रा.तळेगाव दाभाडे) याला अटक केली असून याप्रकर्णी पीडितेने सोमवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे किराणा दुकान आहे. त्या दुकानात एकट्या असताना आरोपी दुकानात आला व त्याने फिर्यादीला मला तू कॉलेजमध्ये असल्यापासून आवडतेस म्हणत गैरवर्तन केले. फिर्यादी घाबरून तेथून पळून जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला व त्यांना अडवून आरोपीने धमकी दिली की, कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या परिवाराला जिंवत सोडणार नाही. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.