…तरी ऑस्ट्रेलियन स्पर्धा होणारच

0
442

मेलबर्न,दि.१७(पीसीबी) – ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेसाठी आलेल्या तब्बल ४७ टेनिसपटूंना हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले असले, तरी नव्या वर्षात ग्रॅंड स्लॅम मालिकेतील पहिली ऑस्ट्रेलिन स्पर्धा ही ठरल्यानुसारच पुढील महिन्यात पार पडणार असा विश्वास ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे मुख्य क्रेग टिले यांनी सांगितले.

देशाच्या विविध भागातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. विशेष म्हणजे काही खेळाडू अशाच विमानामधून येत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी वाढली आहे. लॉस एंजेलिसवरून २४ खेळाडू आले असून, ते थेट हॉटेलमध्ये गेले आहेत. हे खेळाडू आलेल्या विमानातील एक सेवक पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याचबरोबर प्रसारण कंपनीचा एक प्रतिनिधी पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर आबु धाबीवरून आलेल्या विमानातील काही प्रवासी पॉझिटिव्ह आढळले आहेत. या विमानातून २३ खेळाडू प्रवास करत होते. त्यामुळे या खेळाडूंनाही हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

या दोन्ही विमानातून आलेल्या व्यक्तींना थेट आरोग्य हॉटेलमध्ये पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर आता या ४७ खेळाडूंना चौदा दिवस हॉटेल सोडता येणार नाही. त्यानंतरही हे खेळाडू चाचणीच निगेटिव्ह येणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांना हॉटेलमधील रुममधून बाहेर पडता येणार नाही. या खेळाडूंना या चौदा दिवसात सरावाची परवानगी मिळणार नाही.

दरम्यान या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात खेळाडू, पदाधिकारी, तंत्रज्ञ असे एकूण १२०० जण ऑस्ट्रेलियात येणे अपेक्षित आहे. क्युवास, सॅंटिआगो गोन्झालेझ हे त्या विमानातून प्रवास करत होते. महिला दुहेरीतील अनुभवी व्हिक्टोरिया अझारेन्का देखिल लॉस एंजलिसवरून आलेल्या विमानात होती.