तबलीगच्या मौलाना साद यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

0
485

प्रतिनिधी,दि.१६ (पीसीबी) : तबलीगी जमातचे अमीर मौलाना मोहम्मद साद सोबत इतर अनेकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दिल्ली पोलिसांनी दाखल केला आहे. तसेच व्हिसा नियंमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १९०० जमातियांविरोधात लुकआउट नोटिस काढली आहे.

दिल्ली पोलिसांनी मौलाना सोबत इतर १७ लोकांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस काढण्यात आली आहे. परंतु त्यातील ११ जणांनी स्वत:ला क्वारंटाईन केल्याचे कारण देत पोलिस तपासापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. मौलाना साद यांनी सुद्धा क्वारंटाईन असल्याचे पोलिसांनी कळविले. परंतु सर्वांचा आयसोलेशन कालावधी संपला असल्याने पोलिस त्यांना कधीही अटक करु शकतात.

दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथे आयोजित तबलीगी जमातीचा कार्यक्रम भारतासाठी सर्वात धोक्याचा ठरला. जमातीच्या कार्यक्रमात सामील झालेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची शेकडो प्रकरणे देशभरातून सातत्याने समोर येत आहेत. मार्चच्या अखेरीस तबलीगी जमातविरोधात (साथीचा रोग) अधिनियम आणि आयपीसीच्या अनेक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तबलीगी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सुरुवातीच्या चौकशीनंतर आता तबलीगी जमात व्यवस्थापनाविरोधात आयपीसीच् कलम ३०४ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचाही गुन्हा दाखल केला आहे. जमातमधील १९०० विदेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे शाखेने लुकआउट नोटीस काढली आहे. व्हिसा नियमांचे उल्लंघन करीत धार्मीक कार्यक्रमात सामील झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. .