भविष्यात ३० एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन यशस्वी केला तरच कोरोना चा संसर्ग थांबेल – हरिभाऊ बागडे

0
317

 

मुंबई, दि.१६ (पीसीबी) – ‘कोरोना’विरोधात लढण्यासाठी लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. मात्र काही नागरिक सूचनांचे उल्लंघन करून बाहेर पडत पडत आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे माजी अध्यक्ष, आमदार हरिभाऊ बागडे यांनीदेखील याबाबत भाष्य केले आहे.

‘महाराष्ट्रात सोशल डिस्टन्सिंगचे पालन तंतो तंत केले नसल्याने कोरोना च्या रुग्णांची संख्या वाढली. भविष्यात ३० एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन यशस्वी केला तरच कोरोना चा संसर्ग थांबेल,’ असा विश्वास देखील बागडे यांनी व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना बागडे म्हणाले की, ‘राज्यात ज्यांच्या नावे रेशनकार्ड नाही अशा गरजू लोकांना, मजुरांना सरकारने या काळात रेशन द्यावे. ज्यांचे रेशन कार्ड नाही, परंतु नावे ऑनलाइन आहेत, अशांनाही रेशन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

‘कोरोना’ला रोखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत. मात्र या साथीला पुन्हा डोके वर काढायला जराही वाव मिळू नये यासाठी देशव्यापी ‘लॉकडाउन’ येत्या ३ मेपर्यंत वाढविण्याची गोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. याबाबत ते म्हणाले, ‘२१ दिवसांचा लॉकडाऊन पाळला गेला नसल्याने पुन्हा वाढीव लॉकडाऊन घ्यावा लागत आहे,’ असं बागडे म्हणाले