ट्रेनमध्ये वाढत्या गर्दीमुळे पुन्हा एकदा तरूणीला आपला जीव गमवावा लागला

0
588

मुंबई, दि.१७ (पीसीबी) – एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. लोकलमधून पडून एका युवतीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

चार्मी पासद असे या मृत्यू झालेल्या तरूणीच नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,पिडीत तरुणी देसलेपाडा भोपर इथे राहणारी आहे. आज सकाळी चार्मीने ९ च्या दरम्यान डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर ५ वरून मुंबईच्या दिशेने जाणारी फास्ट लोकल पकडली. मात्र, नेहमीप्रमाणे जास्त गर्दी होती. पण कामावर लेट मार्क लागू नये याकरता चार्मीने गर्दीतून लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला आणि तिला जागा मिळाली तिथे ती लोकल ट्रेनमध्ये शिरली. मात्र, लोकल ट्रेनच्या दरवाज्यावरच तिला कशीबशी जागा मिळाली. तरीही ती आत जाण्याचा प्रयत्न करत होती पण कोपर येथे रेल्वेच्या आतून लोड आला आणि दरवाज्यावर उभ्या असलेल्या चार्मीचा तोल गेला. ती डोंबिवली कोपर दरम्यान धावत्या लोकलमधून पडली. ज्यात तिला गंभीर जखमा झाल्या होत्या. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले गेले मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मयत घोषित केले.