ऑस्करच्या शर्यतीमधून “गली बॉय” बाहेर

0
697

मुंबई, दि.१७ (पीसीबी) –भारताकडून ऑस्करच्या सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपट विभागासाठी ‘गली बॉय’  या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. परंतु या शर्यतीमधून ‘गली बॉय’ बाहेर पडला आहे.

सोमवारी १६ डिसेंबर रोजी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सने जाहीर केलेल्या सर्वोत्तम दहा परदेशी भाषांमधील चित्रपटांच्या यादीमध्ये ‘गली बॉय’ला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

“अपना टाईम आयेगा” असं म्हणत अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर ‘गली बॉय’ चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. भारताकडून ऑस्करच्या सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपट विभागासाठी ‘गली बॉय’ चित्रपटाची निवड करण्यात आली होती. परंतु या शर्यतीमधून ‘गली बॉय’ बाहेर पडला आहे.