जुनी सांगवीत मेहुण्यांकडून दाजीवर चाकूने वार    

0
757

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – एकाने बहिणीच्या पतीवर चाकूने वार करून लाकडी दाडक्यांने बेदम मारहाण केली. त्याचबरोबर मुलाला सोडविण्यासाठी आलेल्या सासूलाही सुनेने मारहण केली. हा प्रकार जुनी सांगवीतील शिवप्रताप हौसिंग सोसायटी येथे शुक्रवारी (दि.२२ ) घडला.

या प्रकरणी अभिजित रणजितसिंग राजपूत (वय ३५, रा. शिवप्रताप हौसिंग सोसायटी, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार रश्मी अभिजित राजपूत (वय २८) रश्मीचा भाऊ अक्षय चतुरसिंग परदेशी (वय २० दोघेही रा. परदेशी वाडा, देहूगांव) यांच्यासह आणखी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रश्मी अभिजितची पत्नी असून अक्षय मेहुणा आहे. रश्मी आणि अभिजित मध्ये गेल्या काही दिवसांपासून भांडणे होत आहेत. यातूनच आरोपी अक्षयने शुक्रवारी अभिजितच्या घरी जाऊन चाकूने कानाजवळ, गालावर वार करून जखमी केले. तसेच अक्षयच्या साथीदारांनी फायटरने डाव्या डोळ्याजवळ मारहाण केली. लाकडी दांडक्याने, कुलुपाने मारहाण केली. यावेळी अभिजितची आई त्याला सोडविण्यासाठी गेली असता रश्मीने तिलाही मारहाण केली.

अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.