चिंचवड येथील ग्रेवीस कॉटन कंपनीतून ६ लाखांचे १२ लॅपटॉप चोरीला

0
404

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – येथील ग्रेवीस कॉटन कंपनीच्या आयटी विभागातून अज्ञात चोरट्याने तब्बल ६ लाख रुपये किमतीचे १२ लॅपटॉप चोरुन नेले. ही घटना शनिवारी (दि.६) ते सोमवार (दि.८) या दरम्यान घडली.

याप्रकरणी गिरीष उपेंद्र कुऱ्हाडे (वय ३८, रा. पलाश आयकॉन, अ बिल्डींग प्लॉट क्र. ए/८०३, उद्योगनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.६) ते सोमवार (दि.८) या कालावधीत अज्ञात चोरट्याने चिंचवड येथील ग्रेवीस कॉटन कंपनीमध्ये प्रवेश केला. तसेच कंपनीतील आयटी विभागाच्या कार्यालयात जावून तेथील तब्बल ६ लाख रुपये किमतीचे १२ लॅपटॉप चोरुन नेले. निगडी पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.