चाकूचा धाक दाखवून कार चालकाला लुटले

0
400

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – चिंचवड कडून पुण्याला जात असलेल्या एका कार चालकाला अडवून चार जणांनी मिळून चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना 5 फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजता जुना पुणे मुंबई महामार्गावर सेंट्रल मॉल समोर घडली.

आकाश बनवारी आरजे (वय 27, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजता आकाश आरजे त्यांच्या कार (एम एच 14 / एफ जी 3219) मधून चिंचवड कडून पुण्याकडे जात होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने जात असताना पिंपरी येथील सेंट्रल मॉलजवळ आले असता चार चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी आरजे यांची कार अडवली. त्यांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 15 हजार 300 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.