खोटारड्या आणि संधीसाधू व्यक्तींसाठी मी असाच माजोरडा आहे; आफ्रिदीच्या आत्मचरित्रातील वाक्यावर गौतम गंभीरचे उत्तर

0
331

दिल्ली,दि.१८(पीसीबी) – खोटारड्या आणि संधीसाधू व्यक्तींसाठी मी असाच माजोरडा आहे, असं प्रत्युत्तर गौतम गंभीर याने पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याच्या आत्मचरित्रातील वाक्यावरती ट्विट करून दिलं आहे.

शाहिद आफ्रिदीने आपल्या Game Changer या आत्मचरित्रात भारताताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा माजोरडा असा उल्लेख केला आहे. गौतम गंभीर हा सामान्य वकुबाचा क्रिकेटर असला तरी तो स्वत:ला उगाचच महान समजतो. त्यामुळे तो कायम अशा तोऱ्यात मिरवतो जसा की त्याच्यात डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बाँड यांचा मिलाफच झालेला आहे, असं आफ्रिदीने म्हटलंय.

दरम्यान आफ्रिदीने केलेल्या टीकेला गौतम गंभीरनेही प्रत्युत्तर दिलं आहे. स्वतःचं वय माहिती नसलेला माणूस आज माझ्या विक्रमांबद्दल बोलतोय. खोटारड्या आणि संधीसाधू व्यक्तींसाठी मी असाच माजोरडा आहे अशा आशयाचं ट्विट गंभीरने केलं आहे.