आदित्य ठाकरे होणार मुख्यमंत्री ?

0
680

प्रतिनिधी,दि.१८ (पीसीबी) : राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्याचा राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याकडे केली. परंतु त्याबाबत अजून पर्यंत कोणताही निर्णय राज्यपाल महोदयांनी घेतलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २८ मे २०२० च्या पूर्वी दोनपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून यावे लागणार आहे अन्यथा त्यांना राजीनामा दिल्याशिवाय पर्याय उरणार नाही. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानुसार त्यांना सहा महिन्याच्या आत म्हणजे २८ मे २०२० च्या पूर्वी दोनपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून यावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार होण्यासाठी विधानसभे ऐवजी विधान परिषदेचा मार्ग निवडला होता.

लाॅकडाऊनमुळे निवडणूक आयोगाने एप्रिल २०२० मध्ये विधानपरीषदेतील रिक्त होणाऱ्या आठ जागांची निवडणूक ही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदी नियुक्त करण्याबाबतीच्या राज्य मंत्रीमंडळाच्या शिफारशीवर राज्यपालांकडुन २८ मे २०२० पुर्वी कोणताही निर्णय न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशा परिस्थितीत लाॅकडाऊन उठल्यावर विधानपरिषदेची निवडणूक होऊन उद्धव ठाकरे आमदार होऊ पर्यंत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे असे राजकीय जाणकारांचे मत आहे.