कुदळवाडीत सराईतांकडून सव्वा लाखांचे २५ मोबाईल जप्त; चिखली पोलिसांची कारवाई  

0
719

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – कुदळवाडी येथून अल्पवयीन सराईत गुन्हेगारांना चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सव्वा लाख रूपये किंमतीचे २५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलिसांचे एक पथक कुदळवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून दोघेजण संशयास्पद फिरत असल्याचे लक्षात आले. त्यांना पोलिसांनी हटकले असता ते पळून जाऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे विविध कंपन्यांचे १ लाख १४ हजार रूपयांचे २५ मोबाईल जप्त करण्यात आले. त्यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संदीप बागुल, पोलीस हवालदार मंगेश गायकवाड, राम साबळे, सुरेश जाधव, सुनिल शिंदे, नरहरी नाणेकर, अमोल साकोरे, सचिन गायकवाड, कबीर पिंजारी यांच्या पथकाने केली.