पिंपरीतील ५ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई

0
698

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरीत गंभीर गुन्हे नावांवर असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी केली.

शक्ती रामरतन बहोत (वय ३०, रा. सेनेट्री चाळ, पिंपरी) विशाल बबन गायकवाड (वय २२, रा. गिरजुबाबा मंदिरामागे, बौध्दनगर) मनोहर मारूती सुर्वे (वय रा. पत्राशेड, लिंकरोड), जिंतेद्र सावळाराम शिंदे (वय ३०, रा. भिमनगर, पत्राशेड पिंपरी) लक्ष्मण बाळू शिंदे (वय ३३, रा. वसंतदादा पाटील शाळेसमोर नेहरूनगर, पिंपरी) अशी तडीपारीची कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नांवे आहेत.

वरील सर्व गुन्हेगार सराईत असून त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, इतर काही गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी सांगितले.