काम केले नाही तर ताई, दादा आणि आजोबा सटके देतील – पार्थ पवार

0
719

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – माझ्यावर विश्वास ठेवा…माझ्या पाठीमागे ताई, दादा आणि आजोबा आहेत. जर काम केले नाही तर तिकडून तीन सटके मिळतील. मी काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असे आश्वासन मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांनी दिले आहे. वाकड परिसरात नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.

पार्थ पवार यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, ‘माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पाठीमागे ताई, दादा आणि आजोबा आहेत. जर कामे केली नाही तर तिकडून तीन सटके मिळणार आहेत. काम करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. संवादातून माझा आत्मविश्वास वाढेल’.

पुढे त्यांनी सांगितले की, ‘गेल्या दहा दिवसांपासून बघतोय मीडियामध्ये माझीच चर्चा सुरू आहे. हे पाहून मला आनंद मिळतोय, की माझी अशी सुरुवात झाली. जे काही चालले आहे ते राजकारणात होतेच असते’. यावेळी त्यांनी पाठिंबा देणाऱ्या मित्र परिवार, कुटुंब आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.