पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यासाठी अशोक चव्हाणांनीच ‘ती’ ऑडीओ क्लिप वायरल केली; विनोद तावडेंचा आरोप

0
690

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चंद्रपूरच्या उमेदवारीबाबत पक्षात नाराजी असल्याची ऑडिओ क्लिप स्वतःच वायरल केली, असा आरोप राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. एका  कार्यक्रमात ते बोलत होते.

अशोक चव्हाण नाराज असून ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याच्या संदर्भात त्यांचीच एक ऑडीओ क्लिप नुकतीच वायरल झाली होती. चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या एका कार्यकर्त्यासोबतच्या फोनवरील संभाषणाची ही ऑडीओ क्लिप होती. काँग्रेस हायकमांडवर दबाव आणुन तिकीट बदलायला लावण्यासाठी ही क्लिप अशोक चव्हाण यांनी स्वतःच रेकॉर्ड करायला सांगितली आणि वायरल केली आहे, असा आरोप विनोद तावडे यांनी केला आहे. तसेच अब्दुल सत्तार हे चव्हाणांच्या जवळचे असून त्यांच्याच सांगण्यावरुन सत्तार यांनी राजीनामा दिला आहे, असं देखील तावडे म्हणाले.