कामावर निघालेल्या कामगाराचा डोक्यात दगड घालून खून

0
521

चिखली, दि. २ (पीसीबी) – कंपनीतून सुटल्यानंतर एका गोठ्यात कामासाठी जात असलेल्या एका कामगाराला मारहाण करून डोक्यात दगड घालून दोघांनी खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 31) रात्री नऊ वाजताच्या सुमारास चिखली येथे घडली.

सुनील शिवाजी सगर (वय 35, रा. जाधववाडी, चिखली. मूळ रा. लातूर) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. मयत सगर यांच्या 25 वर्षीय पत्नीने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनील हे एका खासगी कंपनीत काम करीत होते. तसेच ते एका गोठ्यात सफाईचे काम करत होते. शुक्रवारी रात्री कंपनीतून सुटल्यानंतर ते चिखली मधील एका गोठ्यामध्ये सफाईच्या कामासाठी जात होते. जाधववाडी येथून रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

अचानक झालेल्या हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी सुनील हे एका दुकानात घुसले. मात्र, आरोपींनी सुनील यांना दुकानाबाहेर ओढले आणि त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यात सुनील यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.