काँग्रेसचे माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश  

0
921

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – काँग्रेसमध्ये नाराज असलेले पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये केला.  काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून त्यांनी  पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर   रायगड जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

पक्षांतर्गत राजकारणामुळे ते गेल्या विधानसभा निवडणुकीपासून पक्षापासून अलिप्त  होते. त्यानंतर त्यांची भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्याशी  आणि त्यांच्या कुटुंबीयांशी सलगी वाढवली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. बॅरिस्टर अंतुले यांच्यानंतर  जिल्हय़ात  मोठा जनाधार असलेले ते नेते होते.

पेण विधानसभा मतदारसंघातून ते दोन वेळा निवडून आले आहेत. रविशेठ पाटील यांनी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिपदावर काम केले आहे. अंतुलेंचे अत्यंत विश्वासू सहकारी अशीही त्यांची ओळख होती. जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले होते.