बहिणीला त्रास देणाऱ्या मोशीतील तरूणाचा दिघीतील मॅगझीन चौकात खून

0
5157

भोसरी, दि. ५ (पीसीबी) – बहिणीला वारंवार त्रास देणाऱ्या मोशीतील तरूणाचा लोखंडी रॉडने खून करण्यात आला. ही घटना दिघीतील मॅगझीन चौकात मंगळवारी (दि. ५) दुपारी घडली.

विक्रम वाघमारे (वय २५, रा. स्टॅन्ड रोड मोशी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष चौधरी (रा. मोशी) याला दिघी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष याची दिघीतील मॅगझीन चौकात पानटपरी आहे. विक्रम हा संतोषच्या बहिणीला गेल्या एक वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत होता. विक्रमला अनेकदा समजावून सांगण्यात आले होते. मात्र त्याने कुणाचेही ऐकले नाही.

मंगळवारी दुपारी विक्रम हा संतोषच्या पानटपरीवर आला आणि शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे चिडलेल्या संतोषने पानटपरीजवळीव लोखंडी रॉडने विक्रमला मारले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोषला पोलिसांनी अटक केली आहे. दिघी पोलिस तपास करत आहेत.