ऑटोमोबाईल दुकानाचा पत्रा उचकटून 86 हजारांचे साहित्य लंपास

0
153

पिंपरी, दि. ०४ (पीसीबी) : ऑटोमोबाईल दुकानाचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी 86 हजार 357 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी सव्वादहा वाजता चिंचवड एमआयडीसी येथे उघडकीस आली. कुमार सुंदरदास तेजवाणी (वय 46, रा. पिंपळे सौदागर) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेजवाणी यांचे चिंचवड एमआयडीसी मध्ये पवना सहकारी बँकेजवळ गणेश ऑटोमोबाईल हे दुकान आहे. शनिवारी (दि. 2) रात्री आठ ते रविवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या वरच्या बाजूचा पत्रा उचकटून, लोखंडी जाळी कापून दुकानात प्रवेश केला.

दुकानातून रिअर शॉकर्स, फोर्कलेगज, व्हील रिम, चेन किट, इंडिकेटर असेम्ब्ली, चेन कव्हर असे एकूण 86 हजार 357 रुपयांचे साहित्य चोरून नेले. रविवारी सकाळी दुकान उघडण्याच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.