आधी कोरोना त्यातच पुन्हा ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, चार राज्यांत अलर्ट जारी

0
216

मुंबई,दि.०४(पीसीबी) – कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नाही. याच दरम्यान आता दुसर्‍या एका आजाराने लोकांची चिंता वाढवली आहे. सध्या भारतात ‘बर्ड फ्लू’च्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बर्ड फ्लू हा आजार ‘एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस’ (H5N1) द्वारे होतो. बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रकरणांमुळे राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड आणि हिमाचल प्रदेशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा विषाणू संक्रमित पक्षी आणि मानव दोघांसाठीसुद्धा धोकादायक आहे.

‘बर्ड फ्लू’ हा आजार एखाद्या विषाणूजन्य संसर्गाप्रमाणेच आहे. जो केवळ पक्ष्यांसाठीच नाही, तर इतर प्राणी व मानवासाठीदेखील तितकाच धोकादायक आहे. ‘बर्ड फ्लू’ने बाधित झालेल्या पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्राणी व मानवांना त्याची लगेच लागण होते. हा विषाणू इतका धोकादायक आहे की, यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.