उन्नाव बलात्कार प्रकरणी कुलदीप सिंग सेंगरवर आरोप निश्चित

0
521

दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी कुलदीप सिंग सेंगरवर आता ‘पोक्सो’ कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात त्याच्यावर सुरु झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने उन्नाव बलात्कार खटल्याची सुनावणी उत्तर प्रदेशहून दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात हस्तांतरित केली आहे. सेंगरचा सहयोगी शशी सिंग याच्यावर अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत. सेंगरवर भारतीय दंड विधानाच्या कलम १२० ब, ३६३, ३६६, १०९, ३७३(१) आणि पोक्सोच्या कलम ३ आणि कलम ४ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. यामुळे कुलदीप सिंग सेंगरची यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.