राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता उद्या करणार भाजपात प्रवेश

0
815

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला गळती सुरूच असून अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला . आता उस्मानाबादचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राणाजगजितसिंह पाटील उद्या भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर खिंडार पडल्याचे चित्र दिसते .

मात्र या पक्षांतराला उस्मानाबादच्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला असल्याची माहिती समोर येत आहे . राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून राणाजगजितसिंह पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती . तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून राणाजगजितसिंह पाटील कोणतेही पक्षांतर करणार नाहीत असा विश्वास दाखवला होता. मात्र आता या विश्वासावर पाणी फेरले गेले आहे .