इव्हिएम मशीन सेट करून केंद्राप्रमाणे राज्यातही सत्तेवर येणार का? – विजय वडेट्टीवार

377

चिमूर, दि, १५ (पीसीबी) – शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पिक विमा कंपन्यांविरोधात आंदोलन करणाचा इशारा देण्यात आला होता, यावर  विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पीक विम्यासंबंधी शिवसेनेवर टीका करताना कॉंग्रेसची सत्ता येऊ द्या, एका दिवसात बँकाना वठणीवर आणणार अशा आशयाचे विधान केले आहे.

चिमूर येथील शेतकरी भवन येथे आयोजित कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी ‘सत्तेत राहून मलीदा खायचा आणी शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम दाखवायचे असे शिवसेनेचे विचित्र काम सुरू आहे. राज्यातील २५ टक्के शेतकऱ्यांना पीक विमा कर्जाचा लाभ मिळालाच नाही. कॉंग्रेसची सत्ता येऊ द्या, एका दिवसात बँकाना वठणीवर आणणार असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच पुढे बोलताना राज्याचे मुख्यमंत्री राज्यात भाजप सेनेचे २१० जागा निवडून येणार आहेत असे म्हणतात. फडणविसांनी काय भविष्य किंवा कुंडली पाहिली काय ? इव्हिएम मशीन सेट करून केंद्राप्रमाणे राज्यातही सत्तेवर येणार? असा सवाल उपस्थित केला.