निगडीत पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी मायलेकीला टोळक्यांकडून मारहाण

0
516

निगडी, दि. १५ (पीसीबी) – भांडणाची पोलिस चौकीत दिलेले तक्रार मागे घेण्यासाठी आठ जणांच्या टोळक्याने मायलेकीला दगडाने, लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास निगडीतील आझाद चौकात घडली.

याप्रकरणी अनिता नवनाथ गायकवाड (वय ५२, रा. आम्रपाली हौ. सोसायटी, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबा क्षिरसागर, राहूल धोत्रे, कैलास विटकर, रूपेश क्षिरसागर, मयुर धोत्रे, शुभम क्षिरसागर, राणी कांबळे, कविता धोत्रे या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबा क्षिरसागर आणि रेखा कांबळे यांच्या विरोधात फिर्यादी अनिता कांबळे यांनी यमुनानगर पोलिस चौकीत तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी आठही आरोपींनी अनिता आणि त्यांच्या मुलींना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, दगडाने, लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. निगडी पोलिस तपास करत आहेत.