भोसरी एमआयडीसीत लुटमार करणाऱ्या दोघांना अटक

0
449

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – मित्रासोबत पायी चाललेल्या एका तरूणाला जिवे मारण्याची धमकी देत त्याचा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १४ हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेणाऱ्या दोघा चोरट्यांनी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.१३) टेल्को मटेरियल गेटच्या पुढे भोसरी, एमआयडीसी येथे करण्यात आली.

आळेश्वर नरेश म्हेत्रे (वय १९, रा. बोलाईचा मळा, जाधववाडी, चिखली), किशोर बन्सी धनवे (वय २५, रा. वाघेश्वर कॉलनी, जाधववाडी) असे अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी भुषण सुनिल महाजन (वय २०, रा. भोसरी, एमआयडीसी) याने भोसरी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भूषण आणि त्याचा मित्र शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास टेल्को मटेरिअल गेटच्या रस्त्याने पायी जात होते. यावेळी आरोपी आळेश्वर आणि किशोर या दोघांनी त्या दोघांना अडविले. तसेच जिवे मारण्याची धमकी देत भूषणकडील १२ हजारांचा मोबाईल आणि दोन हजारांची रोकड असा १४ हजारांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत आळेश्वर आणि किशोर या दोघांना अटक केली. फौजदार गिरनार अधिक तपास करत आहेत.