आता आपली सत्ता, निर्णयासाठी कुणाकडेही जायची गरज नाही – शिवाजीराव आढळराव

0
157

निगडी, दि. १७ (पीसीबी) – ” मुख्यमंत्री आमचे असले तरी सरकार अजून कुणीतरी चालवतोय. तिजोरीच्या चाव्या जरी आमच्याकडे असल्या तरी खर्च करण्याची अ‍ॅथोरीटी अजून कुणाकडे आहे, याची जाणीव झाली होती. शिवसैनिकांची घुसमठ होत होती. बाहेर पडलो तर, खोके सरकार, मिंदे सरकार, गद्दार, असे आमच्यावर आरोप केले गेले. ज्याप्रमाणे जुगारात हरलेला माणूस वाटेल तसा बडबडतो तशी परिस्थिती काही लोकांची झाली होती. त्या लोकांच्या मनात असे विचार का आले? आहो ५५ पैकी ४० लोकं बाहेर पडतात, असे कसे झाले? राजा आंधळा होतो, तेव्हा प्रधानालाच सत्तेची सूत्रं हाती घ्यावी लागतात. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे आपले प्रधान आहेत. त्यांच्या साथीला साथ देत आपल्याला पुढील येणारी अनेक वर्षे त्यांची ढाल बनून बाळासाहेबांचे विचार अमर करायचे आहेत, त्यासाठी पुन्हा एकदा उठा, संघर्ष करा एकत्रित व्हा. तरच आपण बाळासाहेबांचे सच्चे पाईक होऊ ”, असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

निगडीतील सिझन बेंक्वेट हॉल येथे आज मंगळवारी (दि. १७) रोजी सकाळी अकरा वाजता इरफ़ानभाई सय्यद यांच्या संयोजनेतून विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या उत्साहात ” बाळासाहेबांची शिवसेना ” पक्षात जाहीर पक्षप्रवेश झाला. तसेच उपस्थित शिवसैनिक, पदाधिकारी यांच्यासाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आढळराव पाटील बोलत होते. कार्यक्रमास उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपनेते तथा राज्य अल्पसंख्याक कक्ष प्रदेशप्रमुख इरफानभाई सय्यद, शिरूरचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, मावळचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहर प्रमुख निलेश तरस, उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, जिल्हा संघटिका शैलाजी पाचपुते, शहर संघटक सरिता साने, उपजिल्हाप्रमुख संभाजी शिरसाठ, युवा जिल्हा अधिकारी धनंजय पठारे, जिल्हा संघटक अशोक भुजबळ, तालुकाप्रमुख अरुण गिरे, भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव, पिंपरी विधानसभा प्रमुख रुपेश कदम, चिंचवड विधानसभा प्रमुख सुरेश राक्षे, महिला भोसरी विधानसभा प्रमुख मनिषा परांडे, पिंपरी विधानसभा प्रमुख शैला निकम, चिंचवड विधानसभा प्रमुख शारदा वाघमोड़े,जिल्हा संघटक निलेश पवार, पक्षाचे पदाधिकारी, सर्व महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, पक्षाच्या सर्व अंगीकृत संघटना आणि समस्त शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना आढळराव म्हणाले, २०१९ मध्ये तीन वर्षांपूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापनेची वेळ आली. त्यावेळी मी अमेरिकेत होतो. उद्धव साहेबांना फोन करून आपण कुठेतरी चुकतोय? महाराष्ट्रातील शिवसैनिकांची मतं तरी जाणून घ्या, हे केल्याने काय होणार आहे. आपल्या हिताचं आहे? असे म्हणालो होतो. परंतु, ते तसे नाही तुम्ही आल्यावर बोलू असे म्हणून वेळ मारून नेली. साहेब मुख्यमंत्री होणार याचा आम्हाला आनंद झाला होता. मात्र, हा आनंद महिनाभर टिकला नाही. सरकारची कार्यप्रणाली आणि वर्तवणूक पाहता सहा महिन्यात आमचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे शिवसेनेला ताकद मिळालीच नाही. सत्तेतील वाटेकऱ्यांकडून  उलट आपल्याच तालुका प्रमुखावर खोटे गुन्हे दाखल केले गेले. साहेबांनी त्यावर कोणताच आक्षेप घेतला नाही. परंतु, शिंदे साहेब मदतीला धाऊन आले. पोलीस आयुक्त, डीवायएसपी सुतासारखे सरळ झाले. ” साहेब तुम्ही सत्ता उपभोगा. आम्ही खुश आहोत. आमचं राष्ट्रवादीपासून संरक्षण करा. आम्हाला शांततेत जगू द्या. एवढीच मागणी केली होती. आपल्याच सभापतीच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. त्यावेळी देखील मी उद्धवजींना सरकार आपल आहे. तुम्ही मुख्यमंत्री आहात. त्यांना सांगा असे समजावले होते. मात्र आमचे त्यांच्यापुढे काहीच चालले नाही. आता राज्यात आपली सत्ता आहे. त्यामुळे निर्णय जाग्यावरच होतील. कुणाकडेही जायची गरज नाही. 

इरफान सय्यद म्हणाले, एकेकाळी मुंबई, ठाण्यापुरती मर्यादित असणारी शिवसेना केवळ शिवसैनिकांच्या प्रयत्नामुळे राज्यात फोफावली. दिल्लीश्वराची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या कॉंग्रेसी विचारधारेच्या विरोधात बाळासाहेबांनी अखेरपर्यंत लढा दिला व समाजहिताचे कार्य केले. स्वर्गीय शिवसेना प्रमुख, हिन्दुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला प्रमाण माणून कार्य करणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला अनेक नेते मंडळी व कार्यकर्ते जोड़ली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपले मार्गदर्शक एकनाथजी शिंदे साहेबांकडून आपल्या पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत त्यांच्या कार्याचा आवाका पाहुन राज्यभर जसे मोठ्या प्रामाणावर कार्यकर्ते पक्षा बरोबर जोड़ले जात आहेत. तसेच आता पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेला आणखी उभारी मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळलंच. मात्र पिंपरी चिंचवड शहरातील आघाडीतील पक्षांना आणखी धक्के बसणार आहेत. पुढील काही दिवसात इतर पक्षांचे नगरसेवक आणि पदाधिकारीही पक्ष प्रवेश करतील. पिंपरी चिंचवड महापालिका मित्र पक्षासह आपल्याला काबीज करायाची आहे. पुढील काळात कामाच्या निकशावरून योग्य तो पदभार,जबाबदाऱ्या देण्यात येतील असेही पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी यांना सूचित करून निवडणुका कधीही लागू शकतात. त्यासाठी सज व्हा, असे आवाहन केले.  

शिरूरचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर म्हणाले, महाराष्ट्राला लढल्याशिवाय, झगडल्याशिवाय, बलिदान केल्याशिवाय काही मिळत नाही. काही महाभाग आरोप करतात. सरकार पडण्याची विधानं करतात. त्यांनी लक्षात ठेवावं पुढील अनेक वर्ष एकनाथ शिंदे हेच मुख्यमत्री राहतील. कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला आणखी उभारी मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मावळचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर म्हणाले, शिवसेनाप्रमुखांचे विचार, त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम संवदेनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांच्या विकास कामामुळे जनता प्रभावित झाली आहे. शहराचा विकासाचा संकल्प शिंदे यांनी सोडला आहे. ज्या उद्देशाने मुख्यमंत्री शिंदे यांनी भूमिका घेतली त्याला सर्वांनी साथ द्यावी. जनतेचा विश्वास, अपेक्षा पूर्ण करण्यास आम्ही कटीबध्द आहोत. पक्षात प्रवेश केलेल्यांच्या पाठीशी आम्ही सदैव पाठीशी राहू.

याप्रसंगी शिव वाहतूक सेनेचे शहरप्रमुख तेजस ढेरे (शिवसेना ठाकरे गट),अत्यासंख्यांक आघाडी उपशहर प्रमुख (ठाकरे गट) शाकिर शेख, बळीराम सदाशिव जाधव विभाग प्रमुख (ठाकरे गट), उपविभाग प्रमुख रमाकांत उत्तेकर, शाखाप्रमुख सखाराम धाईंजे, नंदू मोरे, गणेश मालुसरे, अशोक पाटील, मनोहर पवार, दिनेश गौर, तसेच युवा सेना (ठाकरे गट) दत्ता आरोळे, गजानन आडे, विकास भोसले, संग्राम कश्यप, अभिषेक तायनात, लक्ष्मण देसाई, अजय निकम, सुनिल सापते, निशांत मान, आकाश जाधव, प्रदिप पाटील, प्रमोद नवले, आनंद जाधव आकाश वर्मा, राहुल गाटे, गोगेश कोरडे, मंगेश गांवकर, पृथ्वीराज कवडे, तथेच मनिषा परांडे, भोसरी विधानसभा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली सोनाली बोरशे, उपविभाग प्रमुख दिघी, तसेच शाखा प्रमुख मिनिक वाघमारे, पुष्पा नवनाळे, श्रीधर खानापुर, अंजली सुर्वसे, रेणुका काळे, गायत्री देवे, डॉ. माळी भूषण तसेच भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा सदस्य रोहित जगताप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग प्रमुख (चिंचवड) आशिष चव्हाण, सामाजिक कार्यकर्त सागर राउत, भूषण काळे, नुरभाई शेख, हैदर शेख-शाखाप्रमुख, राजू शेख, इरफान पठाण, गंगाल चौधरी, पत्रकार सुनिल पवार, विभागप्रमुख, युवासेना, महिला आघाडी आणि शेकडो शिव सैनिकांनी, तसेच विविध संघटनेच्या पदाधिकारी यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. 
यावेळी ” शिंदे साहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है ” च्या घोषणांनी शिव सैनिकांना स्फुरण चढले होते.