PMPML बससेवा कासारवाडी रेल्वे स्टेशन ते मार्केटयार्ड व भोसरी ते भेकराईनगर सुरु करण्यात नगरसेविका सौ. आशा धायगुडे शेंडगे यांना यश

0
251

पिंपरी, दि.१४ (पीसीबी) : आज दिनांक-१३ जुलै २०२१ रोजी पि एम पि एम एल ची बस सेवा कासारवाडी रेल्वे स्टेशन ते मार्केट यार्ड व भोसरी ते भेकराईनगर अशी सुरु करण्यात नगरसेविका- सौ. आशा धायगुडे शेंडगे यांना यश मिळाले. अनेक वर्षाची कासारवाडी परिसरातील नागरिकांची मागणी आज पुर्ण झाली . कासारवाडी रेल्वे स्रेल्वे गेटखाली परिसरातील नागरीकांना पि. एम .पि.एम .एल च्या बस सेवेसाठी किमान १ ते १.५ कि.मी. ची पायपीट करावी लागत होती. कासारवाडीतील नागरिकांना सध्यस्थितीत CIRT किंवा कल्यापतरू सोसायटी या ठिकाणी असणाऱ्या बस स्थानकाचा वापर करावा लागत होता.

पि एम पि एम एल च्या या बस सेवेच्या उद्घाटन प्रसंगी पि एम पि एम एल चे झोनल अधिकारी तथा वाहतूक व्यवस्थापक मा.श्री. दत्तात्रय झेंडे साहेब वरिष्ठ अधिकारी श्री. संतोष माने, भोसरी डेपोचे मॅनेजर मा.श्री. रमेश चव्हाण साहेब, मा.श्री.नाना साहेब सोनावणे,मा.श्री. मिलिंद शेवाळे, श्री. सुनिल दिवानजी, सौ.शोभा सिंग, सौ.सुवर्णा निकम, सौ.राजेश्वरी गुरव, सौ. संध्या गवळी, सौ. मिनाक्षी गायकवाड, सौ.कासकर, सौ.प्रतिभा पवार, सौ. अल्का दौडकर, सौ. शेवडे,सौ लुंगारे, सौ सुकाळे,सौ.वाघचौरे,श्री अंकुश भामे, श्री. भालेकर, श्री. आदिकराव शिंदे, श्री. सुनील दळवी, श्री.गोरख जवळकर, श्री. रवी जवळकर, श्री. उमेश लांडगे, श्री. लतीफ सय्यद, श्री. रशीद शेख, श्री. अविनाश काटे, श्री. मेघनाथ लांडगे, श्री. चंद्रकांत जाधव,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मा. श्री संजय शेंडगे यांनी कासारवाडी रेल्वे स्टेशन पासुनची ( रेल्वे गेटखाली ) बस सेवा ही आमच्या कासारवाडीकरांना अत्यंत ती हे सांगितले. तसेच नगरसेविका सौ. आशा धायगुडे – शेंडगे यांनी मागील तीन महिन्यातच पि. एम .पि.एम .एल चा पाठ पुरावा करून अत्यंत कमी वेळेत नागरिकांच्या सेवे साठी बस सेवा उपलब्ध करून घेतली. सदर ठिकाणी सध्यस्थिती मधील कासारवाडी रेल्वे स्टेशन नव्याने तयार होणारे मेट्रो स्टेशन व भविष्यातील टान्सपोर्ट हब होणार आहे त्यामुळे ह्या बस स्टॉपचे मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे”. तर मा.श्री. दत्तात्रय झेंडे साहेब म्हणाले की “प्रदूषण टाळण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी जास्तीत जास्त पि. एम .पि.एम .एल या सार्वजनिक वाहतुक सेवेचा वापर करावा अशी विनंती केली. आम्ही चांगली सेवा नागरिकांना देवू” असे आश्वासन दिले

“मा. नगरसेविका सौ. आशा धायगुडे- शेंडगे या म्हणाल्या“ सदर पि. एम .पि.एम .एल बस सेवा ही भोसरी ते भेकराई नगर ही कासारवाडी रेल्वे स्टेशन ( रेल्वे गेटखाली ) खडकी बाजार-येरवडा –पुणे स्टेशन हडपसर मार्गे भेकराई नगर, कासारवाडीतून मार्केट यार्डला जाणारी बस ही – खडकी बाजार- वाकडेवाडी- मनपा-स्वारगेट मार्गे मार्केट यार्ड जाणार आहे. आजचा दिवस हा कासारवाडीकरांसाठी ऐतिहासिक ठरला. आज पि. एम .पि.एम .एल च्या पाटीवर कासारवाडीचे नाव लागल्याने आनंद होत असल्याचे सांगितले.

सदर बस सेवे मुळे माझ्या महिला बहिणी तसेच विद्यार्थी यांची मोठी सोय होणार आहे तरी सदर बस सेवेचा सर्वांनी वापर करण्याचे आव्हान करून उपस्थित सर्वांचे आभार मानले