भोसरीत राष्ट्रवादीला उमेदवार मिळेना; विलास लांडे पुरस्कृत उमेदवार  

443

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – भोसरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी घेण्यास कोणीही तयार नसल्याची नामुस्की राष्ट्रवादी पक्षावर ओढवली आहे. मात्र, विलास लांडे यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

भोसरी विधानसभा मतदार राष्ट्रवादी पक्षाकडून माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने व माजी नगरसेवक जालींदर शिंदे हे इच्छुक होते. मात्र, या पैकी एकाही उमेदवाराने पक्षाची अधिकृत उमेदवारी घेतली नाही. तिघांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीने विलास लांडे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले असून दत्ता साने हे लांडे यांचे प्रचार प्रमुख असतील व शिंदेही आपला अर्ज मागे घेणार आहेत. असे राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले.

WhatsAppShare