राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले

bpcauthor
1 Min Read

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या मनीषा पाचंगे यांच्याकडून पराभव झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने निर्मला नवले यांच्यावर पक्षातील महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

कारेगावच्या माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले या सोशल मीडियावरील सक्रियतेमुळेही चर्चेत असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहेत.

पक्षाने दिलेल्या नव्या जबाबदारीनंतर निर्मला नवले यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, याकडे लक्ष लागले आहे.

Share This Article