गणेशोत्सवादरम्यान भाविकांना वाटण्यात येणाऱ्या महाप्रसादाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने नवी प्रक्रिया लागू केली आहे. त्यानुसार महाप्रसादाचे वाटप करणाऱ्या गणेश मंडळांना तात्पुरता अन्न परवाना घेणे बंधनकारक राहणार आहे.
मंडळाच्या अध्यक्षांनी किंवा अधिकृत प्रतिनिधींनी आवश्यक अर्ज ई-मेलद्वारे पाठवावा. त्यानंतर festivals.mahafda.in या संकेतस्थळावर ‘Stall Holder’ श्रेणीमध्ये ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. तात्पुरत्या परवान्यासाठी ₹१०० शुल्क आकारण्यात येणार आहे.
अर्जामध्ये महाप्रसाद तयार करणाऱ्या स्वयंसेवकाचे किंवा केटररचे नाव आणि संबंधित FDA परवाना क्रमांक नमूद करावा लागेल. महाप्रसाद, इफ्तार, लंगर किंवा भंडाऱ्यासारख्या मोठ्या अन्नवाटपाच्या कार्यक्रमांची माहिती FDAला किमान सात दिवस आधी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.