कासारवाडीत जुन्या वादातून तरुणांवर हल्ला; ॲक्टिव्हाची तोडफोड, तिघांविरुद्ध गुन्हा
पिंपरी, दि. ७ ऑगस्ट २०२६: कासारवाडी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन तरुणांना अडवून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एका तरुणाला दुखापत झाली असून त्याच्या ॲक्टिव्हा दुचाकीचीही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी दापोडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दापोडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, ही घटना ४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कासारवाडी येथील महादेव मंदिरासमोरील रस्त्यावर, रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर घडली.
या प्रकरणी रेहमान जब्बार सिद्दीकी (वय १९, रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ते व त्यांचा मित्र अभिषेक हे ॲक्टिव्हा दुचाकीवरून जात असताना जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी त्यांचा रस्ता अडवला.

