पुण्यातील कोंढवा परिसरात व्हिडिओ कॉलवर बोलत असलेल्या तरुणाच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पसार झाल्याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.

PCB Admin
1 Min Read

पुण्यातील कोंढवा परिसरात व्हिडिओ कॉलवर बोलत असलेल्या तरुणाच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पसार झाल्याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.

ही घटना ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री कमेला परिसरातील प्राइम हॉस्पिटलजवळ घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड जप्त केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, दोघांचा अन्य गुन्ह्यांतील संभाव्य सहभागही तपासला जात आहे.

Share This Article