मुंबईतून ३ कोटींचे कोकेन जप्त

0
400

मुंबई, दि. १० (पीसीबी) – मुंबई कोटीच्या कोकेन तस्करीसाठी आलेल्या परदेशी नागरिकाला अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. फ़्रंक जाँन (२३) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो घाना येथील रहिवासी असून सध्या नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २४ मध्ये राहण्यास होता.

शुक्रवारी रात्री उशिराने त्याला पायधुनी येथील कर्णाक ब्रीज येथून अटक करण्यात आली. त्याच्याक़डुन अर्धा किलो म्हणजेच कोटी किमंतीचे कोकेन हस्तगत करण्यात आले आहेत. अधिक तपास सुरु असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदिप लांडे यांनी दिली.