उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबाबत सहानुभूतीची लाट दिसतेय : छगन भुजबळ

0
90

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी NDTV या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, “विरोधी पक्ष (संविधान संपवण्याबाबत) जो प्रचार करत आहेत, तो जोरात चालला आहे हे तर मान्यच करावं लागेल. लोकांना असं वाटतंय की हे लोक चारसौ पार ची घोषणा देत आहेत ती संविधान बदलण्यासाठीच आहे.

“कर्नाटकातील एका भाजपच्या नेत्यानेही याबाबत विधान केलं आहे. मोदींनी हे अनेकवेळा सांगितलं आहे की आपलं संविधान मजबूत आहे आणि स्वतः आंबेडकर जरी आले तरी ते बदलणं अशक्य आहे. पण लोकांमध्ये हा प्रचार होत आहे.”

उद्धव ठाकरे आणि शरद पवार एनडीएला किती नुकसान करू शकतात? असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यावर भुजबळ म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सभांना जो प्रतिसाद मिळतोय त्यावरून त्यांना मिळणारी सहानुभूती दिसत आहे.

“पक्ष फुटल्यामुळे त्यांच्याबाबत सहानुभूतीची लाट आहे. पण असं असलं तरी लोकांचा विश्वास मोदींवर आहे आणि मोदी सरकार बनवतील असं त्यांना वाटतं.”