अग्रवाल समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौरांकडून सन्मान

0
576

चिंचवड, दि. १० (पीसीबी) –  प्रत्येक मुलाने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासहित पुणे जिल्ह्यात राहणारे अग्रवाल समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिंचवड येथील अग्रसेन भवनात  नुकताच संपन्न झाला. यावेळी  महापौर बोलत होते.

एस्सेन ग्रुप आणि वसंत गु्रप व अग्रवाल समाजाच्यावतीने इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा  लॉ, वैद्यकीय, सीए, अभियांत्रिकी, क्रीडा, कला, आर्किटेक्ट, पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी आणि इतर पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना चिंचवड येथील नवनिर्मित अग्रसेन भवन येथे  महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी  एसेन समूहाचे चेरमन, अग्रवाल समाज,  श्री अग्रसेन ट्रस्ट प्राधिकरण अध्यक्ष भीमसेन अग्रवाल, वसंत समूहाचे चेअरमन व पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष प्रेमचंद मित्तल, चिंचवडचे युवा आइकॉन अनूप मोरे,  मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य तेजस्विनी कदम, भाजप आयटी सेलचे अध्यक्ष राजेश राजपूत आणि समन्वयक आदित्य कुलकर्णी, अग्रवाल समाज महासंघाच्या महिला अध्यक्षा नीता अग्रवाल, पुणे  शहर महिला अध्यक्ष सरस्वती गोयल, तुळजापूरचे सुप्रसिद्ध उद्योगपती देवीचंद अग्रवाल, प्रसिध्द मॉडेल सुनंदा सुर्यवंशी, श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवडचे पूर्व अध्यक्ष वेदप्रकाश गुप्ता, राजकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.  उपस्थित मान्यवरांचे स्वागत राजेश अग्रवाल, भीमसेन अग्रवाल, प्रेमचंद मित्तल यांनी यावेळी केले.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना महापौर राहुल जाधव म्हणाले की, प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलांचा आदर करून त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यास प्रयत्न करावे. जेणे करून तुम्हाला घडविण्यासाठी जे त्यांनी तुमच्यासाठी खस्ता खाल्या आहेत, त्याचे चीज होईल. जसेच एस्सेन गु्रपचे चेअरमन भीमसेन अग्रवाल म्हणाले, जर आपले भविष्य उज्वल हवे असेल, तर शिक्षण आवश्यक आहे. जर शिक्षण असेल तर तुमची प्रगती होईल, पण त्यासोबत देशाचाही विकास होईल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप बिझिनेस सेलचे सुधीर अग्रवाल यांनी केले. तर आभार  राजेश अग्रवाल यांनी मानले.