हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत शिवांजली स्पोर्ट क्लब पुणे विजयी

0
218

भोसरी,दि.२९(पीसीबी) – क्रीडा सभापती प्रा.उत्तम केंदळे  आयोजित भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या.

क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.स्पर्धेच्या दरम्यान अपक्ष गटनेते कैलास बारणे,नगरसेवक सचिन चिखले,नगरसेविका अनुराधा गोरखे,नगरसेविका कमल घोलप,जेष्ठ नगरसेविका सुमन पवळे,नगरसेवक कुंदन गायकवाड,जितु पवार, दिनेश यादव,पांडाभाऊ साने, विजय घोडके,सोमनाथ काळभोर,सुशांत मोहिते,गजानन ढमाले,दीपक कुलकर्णी,तुकाराम वारंग,चंद्रकांत शेडगे,मालोजी चव्हाण,सचिन रांजणे,शेखर आसरकर,सुरज बाबर,अक्षय खोत,आदित्य कुलकर्णी,गिरीश देशमुख, यांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली.

कोरोना महामारीच्या काळात तब्बल  ८ महिन्या नंतर खेळाडूंना मैदानावर खेळण्याची संधी मिळाली. एकूण ६४ संघांनी मुख्य स्पर्धेसाठी सहभाग घेतला होता व ३० स्थानिक संघांनी मिनी कप साठी सहभाग घेतला होता.

प्रथम क्रमांक-शिवांजली स्पोर्ट क्लब पुणे
द्वितीय क्रमांक – ब्रदर स्पोर्टस क्लब निगडी
त्रितीय क्रमांक- खराळवाडी स्पोर्ट क्लब
चतुर्थ क्रमांक-बुर्डे बॉईज स्पोर्ट्स क्लब

मिनी कप विजेते
प्रथम क्रमांक-माऊली स्पोर्ट्स क्लब निगडी
द्वितीय क्रमांक-मोहननगर क्रिकेट क्लब
यांनी पारितोषिक पटकावले