रहाणेचे कर्णधाराला साजेसे वर्तन

0
261

मेलबर्न दि.२८(पीसीबी) : कर्णधार हा संघाला बरोबर घेऊन जाणारा आणि प्रत्येक खेळाडूला जाणून घेणारा असावा, तरच तो खरा कर्णधार ठरतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली वैयिक्तक कारणाने मायदेशी परतल्यावर बदली कर्णधार म्हणून जबाबदारी बजावणाऱ्या अजिंक्य रहाणेने आपल्या वर्तनातून कर्णधार कसा असावा हे दाखवून दिले. पहिल्या कसोटीत लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला प्रतिआव्हान दिले. अजिंक्य रहाणे याने कर्णधाराला साजेशी कामगिरी करताना शतक साजरे केले. शतकानंतरही तो आत्मविश्वासाने खेळत होता. मात्र, सहकारी रवींद्र जडेजा याच्या एका चुकीच्या ‘कॉल’मुळे तो धावबाद झाला.

त्या वेळी ड्रेसिंगरुम मध्ये परतताना रहाणेने त्याच्या जवळ जाऊन त्याला तुझी खेळी चालू ठेवण्याचे खुणेने सांगितले. त्याची ही कृती कॅमेराबंद झाली आणि नंतर सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली. अर्थात, रहाणेच्या बाद होण्याने दुसराच विषय पुढे येतो, तो म्हणजे कर्णधाराच्या खिलाडूवृत्तीचा. रिप्लेमध्ये राहणे क्रीडामध्ये पोचल्याचे दिसून येते. रहाणेने देखील पत्रकर परिषदेत आपण क्रीजमध्ये पोचल्याची खात्री असल्याचे सांगितले. पण, पेनने काही प्रतिक्रिया का दिली नाही हे मला माहित नाही, असे सांगून रहाणे म्हणाला, ‘पेन असा का वागला मला माहित नाही. पण, पंचांनी बाद दिले म्हटल्यावर मी क्रीज सोडले आणि जडेजाला माझ्या बाद होण्याचा विचार करू नकोस, तु पुढे खेळत रहा असा सल्ला दिला. ‘ जडेजाने नंतर कसोटी क्रिकेटमधील आपली १५वी अर्धशतकी खेळी केली.

रहाणेने या वेळी मेलबर्नवर झळकावलेले शतक मोलाचे असले, तरी आपल्याला लॉर्डसवरील शतकत सर्वोत्तम वाटते,असे सांगितले. तो म्हणाला,’संघाची गरज असताना ही खेळी झाली आणि ती देखीर मेलबर्नवर याचा आनंद आहेच. पण, त्यानंतरही मला लॉर्डसवरील शतक अजूनही सर्वोत्तम वाटते. लॉर्डवर शतक झळकाविल्यानंतर तेथील बोर्डवर नाव झळकण्याचा आनंद हा खूप वेगळा असतो. ‘