“स्वराज्यरक्षक संभाजी” मालिका थांबवा खोतकारांनी केली निर्मात्याकडे मागणी

0
462
पुणे, दि.२० (पीसीबी) – स्वराज्यरक्षक संभाजीमालिका शेवटच्या टप्प्यावर असतानाच माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी ही मालिका थांबिण्याची मागणी केली आहे. शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात खोतकर बोलत होते. 
खोतकर म्हणाले, सध्या मालिकेत संभाजी महाराजांना औरंगाजेबाने कैद केल्याचे दाखवण्यात येत असून यानंतरची दृश्यं पाहाणे मनाला पटणारे नाही, या मालिकेतील असे चित्रीकरण रोखता येईल काय, याबद्दल निर्माते तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेलले कल्याणकारी राज्य ही आजही काळाची गरज असल्याचे यावेळी खोतकर म्हणाले.
काही दिवसांपूर्वी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका राजकीय दबावामुळे बंद करण्यात येत आहे,  अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. यावरुनच मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले होते.‘स्वराज्यरक्षक संभाजी’मालिकेवरून शरद पवारांना गोवण्याचा प्रयत्न हा अत्यंत दुर्दैवी आणि हीन दर्जाचा असल्याचे त्यांनी व्हिडीओत म्हटले होते. त्यामुळे खोतकर यांनी मागणी केल्यानंतर निर्माते नक्की काय निर्णय घेतात ते पाहाणे म्हत्त्वाचे ठरणार आहे.