पुणे जिल्हा मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

0
591
पिंपरी, दि.२० (पीसीबी) – पुणे जिल्हा मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने आज दि १९ (बुधवार) रोजी शिवजयंती पुणे जिल्हा कार्यालयात साजरी करण्यात आली. या प्रसंगी याकुब शेख अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना पुणे शहर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले.
याकुब शेख म्हणाले, छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराज चा जन्मदिवस हा शिवजयंतीम्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात. शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. रयतेचा कल्ल्यांना साठी अहोरात्र काळजी घेनारे.व शेतक- यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागनार नाही याची काळजी घेनारे छत्रपती शिवाजी महाराज .मानव हिताच रक्ष करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच कार्य हे आपण सर्वांनी आचरणात आणण्याची गरज आहे.
यावेळी सुभाष कोठारी म्हणाले, छञपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक अनमोल रत्न आहे.राजा कसा असावा याचा आदर्श परिपाठ छत्रपती शिवरायांनी समस्त राजकर्त्यांसमोर निर्माण केला आहे.त्यांचा कालखंड हा भारताच्या इतिहासातील एक दैदिप्यमान व लोकहितैषी कालखंड म्हणून ओळखला जातो.छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्यातील रयतेसोबत जो संवाद,संयम,समन्वय आणि समतोल साधला,त्यामुळे ते रयतेचे राजे झाले व एकप्रकारे रयतच राजा झाली असे म्हटले तरी वावगे होणार नाही.
लक्ष्मण दवणे जनसंपर्क अधिकारी पुणे जिल्हा.मा.आप्पासाहेब आडतरे सहसचिव पिंपरी चिंचवड मानवाधिकार संरक्षण संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मानवंदना देण्यात आली. विजय देवकर उपाध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना पुणे जिल्हा यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष सुभाष कोठारी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय देवकर, पुणे शहर अध्यक्ष याकुब शेख, पुणे जिल्हा खजिनदार ओमकार शेरे, पुणे जिल्हा जनसंपर्क अधिकारी लक्ष्मण दवणे, सहसचिव पिंपरी चिंचवड मानवाधिकार संघटना आप्पासाहेब आडतरे आदी उपस्थित होते.