नागपूर सत्र न्यायालयाच्या बाहेर आल्यावर फडणवीस म्हणाले

0
421
मुंबई, दि.२० (पीसीबी) – २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नागपूर सत्र न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझ्यावरचा खटला हा १९९५ ते १९९८ दरम्यानचा आहे. एक झोपडपट्टी हटवण्यासंदर्भात कारवाई चालू असताना एक आंदोलन केले होते. त्यावेळी काही केसेस झाल्या होत्या. दोन खासगी तक्रारी माझ्याविरोधात झाल्या होत्या. त्या आता संपलेल्या आहेत. २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात ते खटले मी मेन्शन केलेले नाहीत. अशी केस माझ्यावर टाकण्यात आली. सत्र न्यायालयात, उच्च न्यायालयात मी यासंबंधी खटला जिंकलो. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरुन सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. आज मला हजर होण्यास सांगितलं होते. मी तिथे हजर होतो. माझ्यावर व्यक्तीगत कुठलाही खटला नाही. कुठल्या ना कुठल्या आंदोलनाच्या केसेस आहेत आणि मी सगळया केसेस प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या आहेत. वकिलांच्या निर्णयानुसार प्रतिज्ञापत्र तयार केलं. निवडणूक जिंकण्याच्या हेतूने केसेस लपवलेल्या नाहीत. निवडणूक विजयावर परिणाम होईल अशीही ती प्रकरणे नाहीत. सार्वजनिक जीवनात लोकांसाठी संघर्ष करताना तयार झालेल्या केसेस आहेतअसे ते म्हणाले.