‘स्वयंपाक येण’ हे एखाद्या महिलेसाठी तिच्या जिवापेक्षा जास्त महत्वाचं असत का?; अमानुषतेची आणखी एक घटना

0
243

आळंदी, दि. १४ (पीसीबी) – ‘स्वयंपाक कसा करावा हे शिकवले तरी सुद्धा स्वयंपाक येत नाही’ असे म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेला मारहाण केली. तिला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 6 जानेवारी 2021 रोजी रात्री गजानन महाराज मठासमोर आळंदी येथे घडला.

दिगंबर शिवाजी आवटे, कृष्णा शिवाजी आवटे आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 21 वर्षीय विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात 13 जानेवारी रोजी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विवाहितेला स्वयंपाक येत नाही म्हणून आम्ही ब-याच वेळी स्वयंपाक कसा करावा असे शिकवले. तरीसुद्धा स्वयंपाक येत नाही’ असे म्हणून सासरच्या लोकांनी मारहाण करत शिवीगाळ केली. विवाहितेने सासरच्या लोकांना शिवीगाळ करण्याचा जाब विचारला असता आरोपी दिगंबर याने काठीने तर अन्य आरोपींनी हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.