सेंट्रिंग प्लेट भाड्याने घेऊन चार लाखांची फसवणूक

0
536

चिखली, दि. १९(पीसीबी) –
बांधकाम व्यवसायासाठी सेंट्रिंग प्लेटची आवश्यकता असल्याचे सांगून तीन लाख ९५ हजारांच्या ३९५ सेंट्रिंग प्लेट भाड्याने घेतल्या. त्या प्लेट मालकाच्या परस्पर विकून फसवणूक केली. ही घटना जानेवारी २०२२ ते १७ जून २०२२ या कालावधीत मोरेवस्ती चिखली आणि तळवडे येथे घडली.

प्रफुल्ल दत्तात्रेय मुळे (रा. पूर्णानगर,चिंचवड), भगवान गवळी (रा. हरगुडेवस्ती, चिखली), अमोल उर्फ बंटी विलास वाघ (रा. मांजर वाडी, ता. जुन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रामचंद्र नरहरी बिचकुले (वय ६३, मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या मित्राचा विश्वास संपादन केला. बांधकाम व्यवसायासाठी आरसीसी, सेंट्रिंग प्लेटची आवश्यकता असल्याचे भासवले.

त्यांच्याकडून ३९५ सेंट्रिंग प्लेट भाडे तत्वावर घेऊन त्या प्लेट फिर्यादी यांच्या परस्पर अन्य कोणत्या तरी व्यक्तीला विकून फिर्यादी आणि त्यांच्या मित्राची तीन लाख ९५ हजारांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.