सावधान, पिंपरी चिंचवडकर कोरोनाचा विळखा घट्ट होतोय, आनंदनगरला 17 रुग्ण

0
538

पिंपरी, दि. १८ (पीसीबी): पिंपरी चिंचवड शहराला कोरोनचा विळखा घट्ट होतो आहे. आज एकाच दिवसात 24 रुग्ण वाढले आहेत, असे महापालिकेच्या रात्री ८.५० वाजताच्या अहवालात म्हटले आहे.
शरतील एकूण बाधितांची संख्या २२६ झाली आहे.
दरम्यान, करोना मुक्त रुग्णाची संख्या १३१ झाली आहे.
विविध रुग्णालयात उपचार सुरू असलेले ८० रुग्ण आहेत.
पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण ११ आहेत.पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील १२ रूग्ण आहेत.
एकूण मृत १२
असून त्यात शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या ८ जनांचा समावेश आहे.
अद्याप ७८ रुग्णाच अहवाल यायचा आहे.
आजवर एकूण ४,५३८सॅम्पल घेतले. त्यातील ४,४६० प्राप्त झाले.
घरातच अलगीकरण केलेल्याची संख्या ७,७५७ आहे.
शहराची लोकसंख्या सुमारे 30 लाख सांगितली जाते आणि मनपाने सर्वेक्षण केलेल्या नागरिकांची संख्या 29 लाख आहे.
आज कोरोना बाधित आलेले शहरातील २२ रुग्णमध्ये रहाटणी, भाटनगर, भोसरी, दिघी आणि आनंदनगर (चिंचवड स्टेशन) येथील रहिवासी आहेत. तर शहराबाहेरील रुग्ण येरवडा-पुणे आणि नवी मुंबई या परिसरातील आहेत.