अश्वगंधा वनस्पती `रामबाण` ठरते ?

0
629

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – कोरोना व्हायरसने आज जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसला रोखणारे कुठलेही औषध अद्यापपर्यंत सापडलेले नाहीत. HCQ, रेमडेसिवीर, लोपिनावीर, रिटोनावीर, फॅव्हीपीरावीर ही औषधे कोरोनावरील उपचारांमध्ये प्रभावी ठरली आहेत. पण या व्हायरसचे एका व्यक्तीमधून दुसऱ्या माणसामध्ये होणारे संक्रमण रोखणारे किंवा त्या रुग्णाला हमखास कोरोनामुक्त करणारे कुठलेही औषध सापडलेले नाही.

जगभरात कोरोनाला रोखणारी लस बनवण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. विविध सहा देशांमध्ये हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येते. पण बाजारात लस उपलब्ध व्हायला अजून काही महिने लागतील. दरम्यान, आयुर्वेदातील अश्वगंधा वनस्पती अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचे दिसल्याने त्याबाबत आयुष् मंत्रालयानेही गांभिर्याने घेतले असून प्रयोगशाळेत संशोधन सुरू केले आहे.

आज जगभरात ४५ लाखापेक्षा जास्त लोकांना या व्हायरसची बाधा झाली असून तीन लाख लोकांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. जगातील १५० पेक्षा जास्त देशांमध्ये आज या व्हायरसची बाधा झालेले रुग्ण आहेत.
दरम्यान, आता आयुर्वेदाच्या माध्यमातून करोनावर उपचार शोधून काढण्यासाठी संशोधन सुरु आहे. एकूणच या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आयआयटी दिल्ली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स इंडस्ट्रीयल सायन्स अ‍ॅंड टेक्नोलॉजी इन जपान यांच्या एकत्रित संशोधनातून अश्वगंधा हे आयुर्वेदिक औषध करोना व्हायरसवर परिणामकारक ठरत असल्याचे समोर आले आहे आहे. विविध आयुर्वेद औषधालयांतून सद्या अश्वगंधाला मागणी वाढली आहे.