श्वान पाळल्याच्या रागातून महिलेचा विनयभंग

0
310

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – एका महिलेने घरी श्वान पाळला. या रागातून महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता नेहरूनगर रोड, पिंपरी येथे घडली.

कुलकर्णी, वर्षा बांडे, अलोक मिश्रा, सुनीता जैन, मनीष जाधव, नितीन गुप्ता, तनेजा, शिवपूजन (वॉचमन), सागर किल्लेकर, शिव, प्रशांत खडे, इतर रहिवाशी (सर्व रा. नेहरूनगर रोड, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांनी पाळलेल्या श्वानाला फिरण्यासाठी घेऊन जात असताना सोसायटीचा वॉचमन शिवपूजन याने त्याच्या हातातील दांडके फेकून मारले. तसेच फिर्यादी यांच्या सोसायटीमधील अन्य नागरिकांनी फिर्यादी या श्वान पाळत असल्याच्या कारणावरून त्यांना सोसायटीच्या मिटिंगमध्ये बोलावून घेराव घालून फिर्यादी व त्यांच्या पतीला अपशब्द वापरले. यात अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.