घरगुती, व्यावसायिक सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या तरुणाला अटक

0
41

घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडर मधून चोरून गॅस काढून तो चढ्या दराने विक्री करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 6) रात्री साडेआठ वाजता साईनगर ते गहुंजे मार्गावर साईनगर येथे करण्यात आली.

महेश नेताजी पाटील (वय 28, रा. साईनगर, ता. मावळ, पुणे. कोकळगाव, ता. निलंगा, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर सूर्यवंशी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश पाटील याने घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडर मधून चोरून गॅस काढला. तो इतर सिलेंडर मध्ये भरून चढ्या दराने विकण्यासाठी ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी 32 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.