ताथवडे येथे घरातून 10 मोबाईल फोन चोरीला

0
47

ताथवडे येथे एका घरातून चोरट्याने दहा मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 7) सकाळी सात ते आठ वाजताच्या कालावधीत अशोक नगर मधील नवले हाईट्स येथे घडली.

प्रथमेश वासुदेव ठोंबरे (वय 20, रा. अशोक नगर, ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठोंबरे यांचा घराचा दरवाजा मंगळवारी सकाळी उघडा होता. उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून 79 हजार 500 रुपये किमतीचे दहा मोबाईल फोन चोरट्याने चोरून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.