लष्कराचे अत्याधुनिकीकरण करून मोदींनी देशाला बलवान बनवले – खासदार बारणे

0
30
  • भारताला अधिक सक्षम बनवण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक – बारणे
  • राम जन्मभूमी, काश्मीर प्रश्न मोदी यानीच सोडवला – खासदार बारणे

लष्कराचे अत्याधुनिकीकरण करून तसेच संरक्षण उत्पादनांबाबत भारताला आत्मनिर्भर बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला बलवान बनवले आहे. राम जन्मभूमी, काश्मीर सारखे प्रश्न देखील मोदी यांनी सोडवले आहेत. त्यामुळे भारताला अधिकक्ष सक्षम बनवण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे, असे मत मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी व्यक्त केले.

कस्पटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या दशकपूर्ती वर्धापन दिन सोहळ्यात बारणे बोलत होते. त्यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण कस्पटे, उपाध्यक्ष मुकुंद डमकले,

सदस्य नरेश शास्त्री, भीमराव गाडे, प्रभाकर कानडे, नारायण सुरवसे, ज्ञानेश्वरीचे ज्येष्ठ अभ्यासक विजयकुमार फड, माजी नगरसेवक धनराज बिर्दा, महाराष्ट्र केसरी पैलवान विकी तथा विजय बनकर तसेच रामदास कस्पटे, मोतीलाल ओस्तवाल, भरत कस्पटे, रामदास कस्पटे, प्रसाद कस्पटे, स्नेहा कलाटे, संतोष कस्पटे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कस्पटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अध्यक्ष अरुण कस्पटे यांनी खासदार बारणे यांचा सत्कार केला व त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’ चा जयघोष करण्यात आला. खासदार बारणे यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले.