खाजगी फोटो व्हायरल करण्याची तरुणीला धमकी

0
355

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – तरुणीला तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली तिच्या नियोजित पतीला फिर्यादी तरुणीबाबत बदनामीकारक माहिती देऊन तिच्याशी लग्न न करण्याची धमकी दिली. त्यांनतर फिर्यादी तरुणीसोबत अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. ही घटना 22 एप्रिल रोजीधावडे वस्ती भोसरी येथे घडली.

वैभव रामचंद्र सोमवंशी (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला फोन केला. ‘तुझे लग्न ठरल्याचे मला माहित झाले आहे. तुझे लग्न कसे होते तेच मी पाहतो. तुझ्या होणा-या नव-याला आपल्याबाबत सांगून तुझे लग्न मोडतो. तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर आपले दोघांचे फोटो तुझ्या होणा-या नव-याला पाठवून तुझी लाईफ बरबाद करतो’ अशी आरोपीने तरुणीला धमकी दिली.

वारंवार तरुणीला फोन करून त्याच्यासोबत लग्न करण्याची मागणी घातली. तरुणीच्या वडिलांना फोन करून फिर्यादी तरुणीचे लग्न न करण्याची धमकी दिली. तरुणीच्या होणा-या पतीला फोन करून आरोपीने फिर्यादीबाबत चुकीची माहिती दिली. फिर्यादीचे फोटो पाठवून तिची बदनामी केली. फिर्यादी तरुणीसोबत लग्न न करण्याबाबत धमकी दिली.

26 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घराजवळ उभी असताना आरोपी दुचाकीवरून आला. त्याने फिर्यादीचा हात धरून ‘माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मी तुला सोडणार नाही’ अशी धमकी देत विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.